होमपेज

 

 

लालबागचा राजा विसर्जन सोहळा २०१८

लालबागचा राजा ची विसर्जन मिरवणूक रविवार दि. २३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. निघेल. भाविकांसाठी सदर मार्गावरील गिरगांव चौपाटी पर्यंतचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया वर उपलब्ध…
Facebook : Lalbaugcharaja
Tweeter : @LalbaugchaRaja
Instagram : Lalbaugcharaja

 

भाविकांसाठी महत्वाची सुचना : लालबागचा राजा ची चरणस्पर्शाची रांग शनिवार दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ०६.०० वाजता बंद करण्यात येईल.


लालबागचा राजा ची मुखदर्शनाची रांग शनिवार दि. २२ सप्टेंबर २०१८ पर्यंत रात्रौ १२.०० वाजता बंद करण्यात येईल.

 

        लालबागच्या राजाचे दर्शन भाविकासाठी गुरूवार दि. १३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते शनिवार दि. २२ सप्टेंबर २०१८ पर्यंत २४ तास चालु राहिल.

 

लालबागच्या राजा चरणस्पर्श

        लालबागच्या राजाचे चरणस्पर्श गुरूवार दि. १३ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.०० वाजल्यापासून शनिवार दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत  चालू राहील.

        लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शा साठी आलेल्या भाविकांची रांग ग.द.आंबेकर मार्गावरील ओमशांती डेव्हलपर्सच्या आवारातून लागेल. या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांनी करीरोड – भारतमाता सिनेमा – साईबाबा पथ – ग.द.आंबेकर मार्ग – अभ्युदय नगर या मार्गाचा वापर करावा. रेल्वे मार्गाने येणाऱयांनी मध्य रेल्वेचे करीरोड स्थानक वा पश्चिम रेल्वेचे लोअर परेल स्थानक अथवा हार्बर मार्गाचे कॉटनग्रीन रेल्वे स्थानक येथे उतरावे.

लालबागचा राजा मुखदर्शन

        लालबागच्या राजाचे मुखदर्शन भाविकासाठी गुरूवार दि. १३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते शनिवार दि. २२ सप्टेंबर २०१८ पर्यंत रात्रौ १२.०० वाजेपर्यंत चालु राहिल.

लालबागच्या राजाचे मुख दर्शन घेऊ इच्छिणाऱया भाविकांची मुख दर्शन रांग ही रांग दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथून चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण (गरमखाडा मैदान) मार्गे ‘श्रीं’ च्या आवारात येईल. मुख दर्शन घेऊन इच्छिणाऱया भाविकांनी मध्य रेल्वे मार्गाचे चिंचपोकळी स्थानक अथवा हार्बर रेल्वे मार्गाचे कॉटनग्रीन रेल्वे स्थानक येथे उतरावे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कार्यकारिणी मंडळ २०१८-१९